Home अभिभावक शिक्षा सावित्रीच्या वाटेने जाताना….

सावित्रीच्या वाटेने जाताना….

266
0

आज तीन जानेवारीला सावित्रीबाई फुलेंची  जयंती. आधुनिक सरस्वती म्हणून ज्यांचा गौरव केला जातो त्या सावित्रीबाईंनी १७२ वर्षांपूर्वी स्त्री शिक्षणाचं रोपटं या महाराष्ट्रात लावलं आणि आज “तयाचा वेलू गेला गगनावेर्ही”असं म्हणताना आनंद आणि अभिमान वाटतो.मुली शाळेत जायला लागल्या, शिकू लागल्या, साक्षर झाल्या, त्याही पुढे जाऊन त्या जाणत्या व्हायला लागल्या. सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी जी  शिक्षणाची कवाडे मुलींना खुली करून दिली त्यातून मुली इतक्या पुढे गेल्या की आज ज्ञानाच्या प्रत्येक शाखेत त्या अग्रेसर आहेत. मानाच्या स्थानावर स्थानापन्न होऊन आदरसन्मान मिळवताना दिसतात. आपल्या कर्तृत्वाने यशाची शिखरे पादाक्रांत करीत चाललेल्या आजच्या स्त्रियांकडे पाहून सावित्रीबाईंना खरोखर धन्य वाटत असेल.सावित्रीबाईंच्या महान कार्याला निश्चितपणे यश आले आहे.                             

       परंतु दरवर्षी  नुसते त्यांचे स्मरण करून किंवा त्यांच्या कार्याचा गौरव करून आपल्याला थांबता येणार नाही. कारण याबाबतीत अजून खूप काम करण्यासारखे आहे. त्याकाळात मुलींनी शिकावं ही ज्योतिबांची इच्छा किंवा त्याहीपेक्षा महत्वाकांक्षा होती. आज काळानुसार विचार करता मुलीनी यापुढे जाऊन उच्च शिक्षण घेतले पाहिजे, त्या उच्च पदावर कार्यरत असल्या पाहिजेत अशीच इच्छा त्यांनी केली असती. आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे ही इच्छा सत्यात उतरली आहे. महर्षि धोंडे केशव कर्वे यांनी त्या काळात स्त्री उच्च शिक्षणाचा आग्रह धरला होता आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेतले. स्वतंत्र महिला विद्यापीठाचा अमिनव प्रयोग केला. मुलींना, स्त्रियांना त्याचा फायदाही झाला.

 परंतु एक शिक्षिका म्हणून अनेक वर्षे काम करताना जाणवते आहे की एकीकडे मुली खूप पुढे गेल्या आहेत, प्रगत झाल्या आहेत. मुली आताशा बर्याच प्रगल्भ आणि धीटही झालेल्या दिसतात. शिक्षणामुळे त्यांच्यात निर्माण झालेला आत्मविश्वास  मनाला सुखावतो. हे चित्र खरोखरच समाधानकारक आहे. परंतु दुसरीकडे आजही शहरी भागातील अशिक्षित कुटुंबात आणि विशेषतः ग्रामीण भागात मुलीच्या शिक्षणाविषयी बरीच अनास्था दिसते. या मुली शाळेत येतात, शिकतातही.परंतु शिकून मोठं व्हायचं आर्थिक द्रुष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं असा विचार जो आजच्या मुलीनी करणं  अपेक्षित आहे,या मुलीच्या मनात क्वचितच दिसतो.ही वस्तुस्थिती आहे. अशा मुलींना शाळेच्या विषयांव्यतिरिक्त बोलतं करण्याचा प्रयत्न केला तर कळतं की त्यांच्या मनात पुढे खूप शिकण्याची उर्मी आहे. परंतु घरी पालकांना त्यांना उजवून टाकायची घाई झालेली असते. मुलींना शिकवण्याबाबत या आईवडिलांचं दुमत नसतं पण १०वी फार तर१२वी .त्यापुढे मुलींना शिकवण्याची फारशी गरजच पालकांना वाटत नाही. घरातल्या वातावरणामुळे बरेचदा काही मुलींना हळूहळू ते योग्य वाटायला लागतं.अशा बऱ्याच मुली मग १०वी,१२वी आणि काहीवेळा तर ८वी नंतर सुध्दा शिक्षणापासून दूर जातात. ही वस्तुस्थिती पाहताना एक शिक्षिका म्हणून वाईट वाटतं.अर्थात अशा मुली आणि असे पालक यांचे मन वळवण्याचा किंवा विचार बदलवण्याचा प्रयत्न निश्चित पणे केल्या जातो आहे पण या दिशेने जाणीवपूर्वकप्रयत्न करून सावित्रीबाईंच्या महान  कार्याला पुढे नेण्याचीआजही इतक्या वर्षांनंतर सुध्दा गरज आहे असं मनोमन वाटतं.

सावित्री के पथ पर…

3 जनवरी 2023 को सावित्रीबाई फुले की जयंती मनाई गई । सावित्रीबाई, जिन्हें आधुनिक सरस्वती के रूप में जाना जाता है, ने 172 साल पहले महाराष्ट्र में महिला शिक्षा का बीज बोया और आज वे “तायाचा वेलु गेला गगनवेरी” कहकर खुश और गर्वित हैं। सावित्रीबाई और ज्योतिबा ने लड़कियों के लिए जो शिक्षा के द्वार खोले, उन्होंने इतनी तरक्की की है कि आज वे ज्ञान की हर शाखा में अग्रणी हैं। सम्मान के पद पर आसीन होने से इन्हें सम्मान प्राप्त होते देखा जाता है। सावित्रीबाई आज की महिलाओं को अपनी उपलब्धियों से सफलता की ऊंचाइयों को छूते हुए देखकर वास्तव में धन्य हैं।सावित्रीबाई का महान कार्य निश्चित रूप से सफल रहा है।

लेकिन हम हर साल सिर्फ उन्हें याद करने या उनके काम को महिमामंडित करने से नहीं रुक सकते। क्योंकि इस संबंध में अभी बहुत काम किया जाना बाकी है। उन दिनों ज्योतिबा की इच्छा या महत्वाकांक्षा यह थी कि लड़कियों को सीखना चाहिए। आज के समय को देखते हुए उनकी इच्छा होती कि लड़कियां आगे बढ़कर उच्च शिक्षा प्राप्त करें, वे उच्च पदों पर कार्य करें। खुशी और गर्व से, यह इच्छा पूरी हो गई है। महर्षि ढोंडे केशव कर्वे ने उस समय महिलाओं के लिए उच्च शिक्षा पर जोर दिया और इसके लिए कड़ी मेहनत की। अमीनव ने स्वतंत्र महिला विश्वविद्यालय के साथ प्रयोग किया। इसका लाभ बालिकाओं व महिलाओं को भी मिला।

लेकिन कई वर्षों तक एक शिक्षक के रूप में काम करने के बाद, यह महसूस होता है कि एक ओर लड़कियां बहुत आगे निकल गई हैं, आगे बढ़ गई हैं। लड़कियां अब ज्यादा गंभीर और बोल्ड दिखती हैं। शिक्षा द्वारा उनमें बनाया गया विश्वास प्रशंसनीय है। यह तस्वीर वाकई सुकून देने वाली है। लेकिन दूसरी ओर आज भी शहरी क्षेत्रों और विशेषकर ग्रामीण क्षेत्रों में अशिक्षित परिवारों में बालिकाओं की शिक्षा के प्रति काफी उदासीनता है। ये लड़कियां स्कूल आकर पढ़ती हैं।लेकिन बड़ा होकर आर्थिक रूप से खड़े होने,अपने पैरों पर खड़े होने का विचार जिसकी आज की लड़कियों से अपेक्षा की जाती है, इस लड़की के मन में कम ही देखने को मिलती है।यह एक सच्चाई है। अगर आप ऐसी लड़कियों से स्कूली विषयों के अलावा अन्य विषयों पर बात करने की कोशिश करेंगे तो आपको पता चलेगा कि उनमें आगे सीखने की काफी ऊर्जा है। लेकिन घर पर माता-पिता उन्हें फेंकने की जल्दी में होते हैं। ये माता-पिता लड़कियों को पढ़ाने से असहमत नहीं हैं, लेकिन 10वीं और 12वीं में भी, उसके बाद माता-पिता को लड़कियों को पढ़ाने की ज्यादा जरूरत महसूस नहीं होती है। घर के माहौल के कारण कुछ लड़कियों को धीरे-धीरे यह महसूस करना पड़ता है।ऐसी कई लड़कियां तो 10वीं, 12वीं और कभी-कभी 8वीं के बाद भी पढ़ाई छोड़ देती हैं। एक शिक्षक के रूप में मुझे यह देखकर दुख होता है। बेशक, ऐसी लड़कियों और ऐसे माता-पिता के मन को मनाने या बदलने का प्रयास जरूर किया जाता है, लेकिन मुझे लगता है कि इतने वर्षों के बाद भी सावित्रीबाई के महान कार्य को इस दिशा में सचेत प्रयास करके आगे बढ़ाने की जरूरत है।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here