भारतात शिक्षण आहे पण शिक्षणात भारत नाही – दिलीप बेतकेकर
जाहीर व्याख्यान – शिक्षक- पालकांची उपस्थिती लक्षणीय
अकोला : आई वडील हे मुलांचे पहिले गुरू आहेत आणि शिक्षक हे मुलांचे दुसरे पालक आहेत. बालक हे राष्ट्राचे बळ असून आईची मांडी जगातलं सर्वात मोठं विद्यापीठ आहे. प्राथमिक शिक्षण हेच खरे शिक्षण आहे. सुसंस्काराचे दान म्हणजे शिक्षण आहे. शाळेतील शिक्षण जन्मभर पुरत नाही म्हणून ग्रंथ वाचन केले पाहिजे. सोळाव्या वर्षापर्यंत स्वावलंबनाचे शिक्षण आणि सोळाव्या वर्षानंतर स्वावलंबनाने शिक्षण, भारतात शिक्षण आहे पण शिक्षणात भारत नाही. मुलांच्या बौद्धिक विकासात संस्कृत शिक्षणाची महत्त्वाची भूमिका आहे. भारतीय शिक्षणाच्या सुत्रांकडे आपण दुर्लक्ष केल्यामुळे आपण त्याचे परिणाम भोगतो आहे. भारतात परीक्षा पद्धत आहे पण शिक्षण पद्धत नाही. भारत हा एकमेव असा देश आहे ज्या ठिकाणी त्या देशातील लोकांना आपल्या देशाच्या संस्कृतीचा तिरस्कार करणे शिकवले जाते. ज्या परकीय आक्रमकांनी आपल्या देशावर आक्रमण केले त्यांचे कौतुक करणे आपल्या मुलांना शिकवल्या जाते. शिक्षक व पालकांना मार्गदर्शन करण्याकरिता विद्या भारती द्वारा “कोविड-१९ नंतरचे प्राथमिक शिक्षण व भेडसावणार्या समस्या” या विषयावर दिलीप बेतकेकर, गोवा, यांचे जाहीर व्याख्यान एल.आर.टी. कॉमर्स कॉलेज येथे आयोजित करण्यात आले होते.
प्रथम सरस्वती पूजन व वंदनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. उपस्थित मान्यवर प्रमुख वक्ते दिलीप बेतकेकर, बी जी सोसायटीचे नवनियुक्त अध्यक्ष मोतीसिंह मोहता व विद्या भारती चे नवनियुक्त अकोला जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव खारोडे यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष राम देशमुख यांनी विद्या भारतीच्या कार्याची माहिती विशद करीत विद्या भारतीच्या देशात 13 हजार शाळा असून कोणतेही सरकारी अनुदान न घेता समाजाच्या मदतीने उत्तम शाळा चालवीत असल्याचे त्यांनी सांगितले आज विद्या भारतीच्या कार्याला 72 वर्ष पूर्ण झाल्याच्या सांगितले.या कार्यक्रमाचे संचलन आकांशा देशमुख, प्रास्ताविक परिचय गिरीजा कानडे तर वंदे मातरम योगेश मल्लेकर यांनी गायले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नरेंद्र देशपांडे संघचालक, रा.स्व.संघ, अकोला विभाग, अॅड. मोतीसिंह मोहता अध्यक्ष, बेरार एजुकेशन सोसायटी, अकोला डॉ. राम देशमुख. अध्यक्ष, विद्या भारती विदर्भ. शैलेश जोशी संघटन मंत्री, विद्या भारती विदर्भ विठ्ठल खारोडे अकोला जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते. अकोल्यातील पंचवीस शाळांचे संस्थाचालक, गणमान्य नागरिक तथा 750 च्या वर शिक्षक-पालकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्वच कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
हिन्दी अनुवाद
सार्वजनिक व्याख्यान – शिक्षक-अभिभावकों की उपस्थिति महत्वपूर्ण है
अकोला : माता-पिता बच्चों के पहले शिक्षक और शिक्षक बच्चों के दूसरे माता-पिता होते हैं. बच्चे देश की ताकत होते हैं और मां की गोद दुनिया की सबसे बड़ी यूनिवर्सिटी होती है। प्राथमिक शिक्षा ही वास्तविक शिक्षा है। अच्छे संस्कार का उपहार शिक्षा है। स्कूल में शिक्षा जीवन भर के लिए पर्याप्त नहीं है इसलिए किताबें पढ़नी चाहिए। सोलहवें वर्ष तक स्वावलंबन शिक्षा और सोलहवें वर्ष के बाद स्वावलंबन शिक्षा भारत में शिक्षा तो है लेकिन शिक्षा में भारत नहीं है। संस्कृत शिक्षा बच्चों के बौद्धिक विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाती है। क्योंकि हम भारतीय शिक्षा के सिद्धांतों की उपेक्षा करते हैं, हम परिणाम भुगत रहे हैं। भारत में परीक्षा प्रणाली है लेकिन शिक्षा प्रणाली नहीं है। भारत ही एक ऐसा देश है जहां लोगों को अपने ही देश की संस्कृति से नफरत करना सिखाया जाता है। हमारे बच्चों को हमारे देश पर आक्रमण करने वाले विदेशी आक्रमणकारियों की प्रशंसा करना सिखाया जाता है। शिक्षकों और माता-पिता का मार्गदर्शन करने के लिए दिलीप बेटकेकर, गोवा, एलआरटी द्वारा “प्राथमिक शिक्षा और कोविड-19 के बाद के मुद्दे” पर विद्या भारती द्वारा सार्वजनिक व्याख्यान। इसका आयोजन कॉमर्स कॉलेज में किया गया।
कार्यक्रम की शुरुआत सर्वप्रथम सरस्वती पूजन व वंदन से हुई। इस स्थान पर उपस्थित गणमान्य व्यक्तियों, मुख्य वक्ता दिलीप बेटकेकर, बीजी सोसाइटी के नवनियुक्त अध्यक्ष मोतीसिंह मोहता और विद्या भारती के नवनियुक्त अकोला जिलाध्यक्ष विठ्ठलराव खारोड़े का अभिनंदन किया गया। कार्यक्रम के अध्यक्ष राम देशमुख ने विद्या भारती के कार्यों को विस्तार से बताया और कहा कि विद्या भारती के देश में 13 हजार स्कूल हैं और बिना किसी सरकारी अनुदान के अच्छे स्कूल चलाते हैं उन्होंने कहा कि आज विद्या भारती के कार्य को 72 वर्ष पूरे हो गए हैं. कनाडे जबकि वंदे मातरम को योगेश मल्लेकर ने गाया था। नरेंद्र देशपांडे संघचालक, राष्ट्रीय संघ, अकोला मंडल, एड. मोतीसिंह मोहता अध्यक्ष, बरार एजुकेशन सोसायटी, अकोला डॉ. राम देशमुख. अध्यक्ष, विद्या भारती विदर्भ। शैलेश जोशी केंद्रीय मंत्री, विद्या भारती विदर्भ विठ्ठल खरोड़े अकोला जिला अध्यक्ष उपस्थित थे। अकोला के पच्चीस विद्यालयों के प्रधानाध्यापकों, गणमान्य व्यक्तियों एवं 750 से अधिक शिक्षकों एवं अभिभावकों ने इस कार्यक्रम का आनंद लिया।
और पढ़े:-A Fateful Moment in Bharatiya Education System – Launching of “JADUI PITARA”